Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूपमध्ये ‘आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’चे भव्य उद्घाटन; ग्रामीण रुग्णांना अत्याधुनिक उपचारांची सुविधा...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : मंद्रूप येथील लोकसेवा शाळेसमोर उभारण्यात आलेल्या आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन शनिवार (दि. ७ मार्च २०२६) रोजी सायं. ६ वाजता मनिष (भैय्या) देशमुख (संचालक, श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर) यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेले हे हॉस्पिटल परिसरातील रुग्णांसाठी मोठा आधार ठरणार आहे.

उद्घाटन प्रसंगी बोलताना मनिष (भैय्या) देशमुख म्हणाले की, “मंद्रूपसारख्या ग्रामीण भागातील रुग्णांना ‘आधार हॉस्पिटल’चा मोठा आधार मिळणार आहे. विविध शासकीय आरोग्य योजनांच्या माध्यमातून रुग्णांना उपचारासाठी आर्थिक दिलासा मिळेल.”  यावेळी त्यांनी डॉ. योगेश राठोड, डॉ. शीतल राठोड आणि युवराज (भैय्या) राठोड यांच्या पुढाकाराचे कौतुक करत ग्रामीण भागासाठी उभारलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ICU व क्रिटिकल केअर युनिटसह विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंद्रूप व परिसरातील रुग्णांना तातडीच्या उपचारांसाठी शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या उद्घाटन सोहळ्याला सरपंच अनिता कोरे, मंद्रूप पोलीस ठाण्याचे पीएसआय राज डांगे, पंचायत समिती सदस्य प्रियांका रमेश आसबे, मोतीलाल राठोड (जिल्हाध्यक्ष, ए.आय.बी.एस.एस.), गौरीशंकर मेंडगुदले (संघटक सरचिटणीस, भाजप), जेष्ठ नेते महेश देवकर, विशाल गायकवाड, नगरसेवक दिपक जमादार, मंद्रूपचे माजी सरपंच रमेश नवले, सचिन फडतरे (तालुका अध्यक्ष), सोनाली कडते (जि.प. सदस्य, मंद्रूप गट), माजी उपसरपंच मोतीराम चव्हाण, डॉ. कैलास कसबे (चेअरमन, अल्ट्राएज फायनान्स), ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे, पीरसाब हवालदार (उपसरपंच, निंबर्गी), आप्पासाहेब कोळी (संचालक, द्राक्ष बागायतदार संघ) तसेच बाळासाहेब झांबरे पाटील (संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ), उमेश मळेवाडी, यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने सुरू झालेले आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंद्रूप व परिसरातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने आरोग्याचा ‘आधार’ ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




Post a Comment

0 Comments