अकलूज | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत एका सराईत आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून ५ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील घरफोडी गुन्हे उघड करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत गुन्हे आढावा बैठकीत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कारवाई केली.
२२ ऑक्टोबर २०२५ रोजी श्रीपूर येथील पाटील वस्ती परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के यांना गोपनीय माहिती मिळाली की, नातेपुते येथील जबरी चोरी प्रकरणातील पाहिजे आरोपी शुभम परशुराम भोसले याने श्रीपुर येथील घरफोडी केली आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून शुभम परशुराम भोसले (वय २०, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, अकलूज) याला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने आपल्या साथीदारांसह
आशिष शितल काळे (रा. उगलेवाडी, ता. कराड, जि. सातारा)
रोहित सचिन काळे (रा. बारामती, जि. पुणे)
यांच्यासोबत मिळून घरफोडीचे एकूण ५ गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलीसांनी आरोपीकडून
२८ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे ४,२०,००० रु.)
९७ किलो तांब्याची तार (किंमत अंदाजे ९७,००० रु.)
असा एकूण ५,१७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर आरोपीविरुद्ध माळशिरस, अकलूज व इतर पोलीस ठाण्यांत घरफोडी व जबरी चोरीचे एकूण ६ गुन्हे दाखल असून तो इतरही गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्याचे तपासात समोर आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावालकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय गोसावी, भिमगोंडा पाटील, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के व त्यांच्या पथकाने केली.
.jpg)

0 Comments