Advertisement

Breaking News
Loading...

कात्राळ येथे महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका श्रीमंती बिरूणगी यांचा ‘आदर्श गौरव चिन्ह’ पुरस्काराने सन्मान...

 

मंगळवेढा : कात्राळ (विभाग मरवडे) येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक १ मधील अंगणवाडी सेविका (मदतनीस) श्रीमंती शिर्यव्वा दशरथ बिरूणगी यांना महिला दिन २०२५–२०२६ निमित्त जिल्हा परिषद सोलापूरच्या महिला व बालविकास विभागामार्फत विशेष सन्मान करण्यात आला.


या उल्लेखनीय क्षणी जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा. कुलदीप जंगम यांच्या हस्ते श्रीमंती बिरूणगी यांना ‘आदर्श गौरव चिन्ह’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार केवळ सन्मान नसून समाजसेवेतील त्यांचे समर्पण, बालविकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी केलेल्या कार्याचे प्रतीक मानला जात आहे.


गेल्या १५ वर्षांपासून अंगणवाडी क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्रीमंती बिरूणगी यांनी अंगणवाडी केंद्राचे सुयोग्य व्यवस्थापन करताना बालविकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. तसेच महिलांच्या स्वावलंबनासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, गावातील लहान मुलांच्या आरोग्य, पोषण आणि शिक्षणाबाबत जनजागृती यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.


त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत महिला व बालविकास विभागाने त्यांना ‘आदर्श गौरव चिन्ह’ पुरस्काराने गौरविले. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Post a Comment

0 Comments