Advertisement

Breaking News
Loading...

IDF फायनान्स सर्विस प्रायव्हेट लिमिटेड मंद्रुप यांच्यावतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील IDF फायनान्स सर्विस प्रायव्हेट लिमिटेड मंद्रुप यांच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्रथमतःअहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्या नंतर यावेळी युनिट मॅनेजर सतिश चव्हाण बोलताना म्हणाले की आजच्या आधुनिक युगात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत.

शिक्षण, विज्ञान,क्रीडा,राजकारण,उद्योग,प्रशासन अशा सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी मोठे यश मिळवले आहे. आपल्या देशातील अनेक महान महिलांनी समाजासाठी प्रेरणादायी कार्य केले आहे. घर सांभाळण्यापासून ते देश चालवण्यापर्यंत महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. म्हणूनच असे म्हणतात की, "महिला सशक्त असेल तर समाज सशक्त होतो."


आजही काही ठिकाणी महिलांवर अन्याय, भेदभाव आणि अत्याचार होताना दिसतात. त्यामुळे प्रत्येकाने महिलांचा आदर करणे, त्यांना समान संधी देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे ही आपली जबाबदारी आहे.यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. 

यावेळी पूजा खंडारे प्रियांका कोळी, खलिमा नागरे,रेखा खंडारे, शारदा राठोड, दिपाली खंडारे, सुश्मिता विभुते बचत गटाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.यावेळी युनिट मॅनेजर सतीश चव्हाण,बीएम महेश पांढरे,cro निसर्ग कदम,धनराज चोळे अविनाश विभुते आदी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments