Advertisement

Breaking News
Loading...

विंचूर येथे सोलापूर सोशल फाउंडेशन तर्फे महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव...

 


विंचूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : विंचूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर सोशल फाउंडेशन व उमेद अभियान यांच्या वतीने “सन्मान स्त्री शक्तीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम सोमवार, 09 मार्च 2026 रोजी  पंचाक्षरी विद्यालय, विंचूर येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सोनालीताई कडते व पंचायत समिती सदस्या प्रियांकाताई आसबे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून अतुल क्षीरसागर, उमाताई बिराजदार, सारिकाताई पाटील (सरपंच) व सुजाता व्हनकुडे (ग्रामसेविका) उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश दसवंत यांनी केले. यावेळी सोलापूर सोशल फाउंडेशन समाजातील विविध घटकांसाठी 5P संकल्पनेच्या माध्यमातून कार्य करत असल्याची सविस्तर माहिती देत, समाजसेवेचे ब्रीद घेऊन संस्था कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अतुल क्षीरसागर यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांचे स्वावलंबन, महिला सक्षमीकरण तसेच महिलांसाठी उद्योग-व्यवसायाच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुलारी सर यांनी केले. याप्रसंगी महिला बचत गटांच्या सदस्यांसह विंचूर गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सोलापूर सोशल फाउंडेशन तर्फे ट्रॉफी व शाल देऊन सन्मान करण्यात आला. 

सन्मानित महिलांमध्ये

जय रघुवीर महिला स्वयंसहायता समूह,

विराट देवी स्वयंसहायता समूह,

सुमित्रा गजानन कोठे (उद्योजिका – श्रीराम गट),

प्रतिभा बसवंत चौगुले (उद्योजिका – सखी गट),

मिरा यल्लाप्पा कोळी (व्यावसायिका – जय वाल्मीकी गट), 

ज्योती नागनाथ फुलारी (हस्तकला विणकाम),

धानम्मा जगन्नाथ लोणारी (हॉटेल व्यवसाय) आदी महिलांचा समावेश होता.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशन व उमेद अभियान यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.




Post a Comment

0 Comments