Advertisement

Breaking News
Loading...

घराला घरपण देणारा मायेचा ओलावा म्हणजेच स्त्रीशक्ती-- अध्यक्ष ला.प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी

 


सोलापूर शहर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : कन्ना चौकातील हरी ओम विणकर बागेत जागतिक महिला दिन व रंगपंचमी उत्साहात संपन्न करण्यात आले. 

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लायन्स क्लबऑफ सोलापूर सेंट्रलचे अध्यक्ष.प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी म्हणाले," घरातील शिस्त आणि पारदर्शकता आणणारी कल्पकता म्हणजेच स्त्री असून, आजही समाजातील सामाजिक मूल्यांची जपणूक, नीतिमत्ता  संस्कारांची परंपरा जिवंत ठेवण्यात महिलाच अग्रस्थानी आहेत. संस्कारयुक्त,सुसंस्कृत व संवेदनशील नागरिक घडविण्याच्या महान कार्यात स्री शक्तीचा वाटा बहुमोल असून आई,पत्नी,बहिण,कन्या इत्यादी विविध भूमिकेतून त्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करत, समाज व राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी करण्याचे महान कार्य करीत आहेत'' .प्रा स्वामीनाथ कलशेट्टी पुढे म्हणाले की, " मुलांच्या डोळ्यात स्वप्न पेरणारी आई व बापाचा स्वाभिमान जपणारी लेक म्हणजेच स्त्रीशक्ती होय.आजच्या महिला केवळ घराच्या चौकटीत मर्यादित न राहता शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक,संरक्षण, वैज्ञानिक इत्यादी  क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आपले कर्तृत्व सिद्ध करत, समाजाला नवी दिशा देत आहेत. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे समाजात सकारात्मक परिवर्तनाची प्रक्रिया अधिक बळकट होत असून,समाजाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिला शक्ती ही प्रेरणादायी आणि परिवर्तनाची केंद्रबिंदू आहे." म्हणून स्त्री शक्तीचा सन्मान करणे म्हणजे केवळ एका दिवसाचा उत्सव नसून तर तो दररोज पाळण्याचा एक संस्कार आहे असेही म्हणाले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हरी ओम विणकर बाग बहुउद्देशीय  महिला संघटनेचे अध्यक्षा सौ.नागमणी हिरालाल धुळम यांच्या हस्ते लक्ष्मीबाई बटगिरी, अरुणा मिठ्ठा, प्रमिला संगा, अनुराधा अरकाल,सुजाता उरट रजनी दासरी,निलावती गंजी, लक्ष्मीबाई यज्जा,सविता महिंद्रकर, इत्यादी महिलांचा शाल, गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी हरी ओम विणकर बाग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बालाजी जंगम व सर्व पदाधिकाऱ्यांचांही खारीक खोबऱ्याचे व साखरेचे हार घालून यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्व सदस्यांमध्ये नैसर्गिक रंगांची मनसोक्त उधळण करत रंगपंचमी साजरी करण्यात आली.

याप्रसंगी बहुसंख्य महिला व सदस्यांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष बालाजी जंगम,गणेश सिद्धम, लक्ष्मीकांत दंडी ,अशोक येज्जा हिरालाल धुळम व सर्व सभासद लायन्स क्लब मधील सर्व सदस्य,इत्यादींचे बहुमोल सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश सिद्धम व आभार सचिव दीनानाथ धुळम यांनी केले.



Post a Comment

0 Comments