Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूपमध्ये गुणवंत खेळाडूंचा गौरव; न्यू गोल्डन क्लबचा १७ वा वर्धापन दिन उत्साहात...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : मंद्रूप येथे न्यू गोल्डन क्लबच्या वतीने आयोजित १७ व्या वर्धापन दिनानिमित्त परिसरातील गुणवंत खेळाडूंचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना, “गावातील खेळाडूंनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून गावाचे नाव उज्ज्वल करावे,” असे आवाहन केले.

न्यू गोल्डन क्लबच्या माध्यमातून गेल्या सतरा वर्षांपासून मंद्रूप व परिसरातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने कार्य केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता कोरे होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी सोनाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड, पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, ग्रामसेविका सुजाता व्हनकडे, प्रा. डॉ. कैलास कसबे, माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ, मोहमद अलकमा, ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे, सुरेश टेळे, शिवानंद लोभे, यासीन मकानदार, प्रा. उमाशंकर रावत, श्रीधर टेळे, भागण्णा अटकर, माजी उपसरपंच मोतीराम चव्हाण, उपसरपंच पिरसाब हवालदार, दानेश शेख, मल्लीनाथ घाले, संतोष बरूरे, प्रवीण कुंभार, शिवराज मुगळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबलू शेख यांनी केले. सूत्रसंचालन बिलाल शेख यांनी केले तर आभार आरिफ नदाफ यांनी मानले.


Post a Comment

0 Comments