Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूपमध्ये शेतकऱ्यांचा संताप उफाळला; सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | मंद्रूप येथील अप्पर तहसील कार्यालयाकडे शेतकऱ्यांच्या वतीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या शेतीसाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा नियमित मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पूर्वी दिवसाला सुमारे ८ तास वीजपुरवठा होत होता. मात्र, अलीकडे हा पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित होत असून तीन तासही व्यवस्थित वीज मिळत नाही. परिणामी पिकांना पुरेसे पाणी देता येत नसल्याने शेती पिके जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे शेतीतील मोटारी जळण्याच्या घटना देखील वाढल्या असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे दिवसा किमान ८ तास नियमित व सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेतकऱ्यांना घेऊन उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ही मागणी महमद शब्बीर, जिल्हा सचिव (सोलापूर) यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

याप्रसंगी मोहम्मद शेख आणि रमेश कुंभार यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले आहे.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

Post a Comment

0 Comments