मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे | मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा अवघ्या १२ तासांत शोध लावून तिला सुखरूप परत आणण्यात मंद्रूप पोलिसांना यश आले आहे. या विजेगती कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
दि. १४ एप्रिल २०२६ रोजी मंद्रूप हद्दीतील एका गावातील एका व्यक्तीने त्यांची पुतणी बेपत्ता झाल्याची तक्रार मंद्रूप पोलीस ठाण्यात दाखल केली होती. संबंधित मुलगी सकाळी सुमारे १०:३० वाजता "नातेवाईकांकडे जाऊन येते" असे सांगून घराबाहेर पडली होती; मात्र ती परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता तिचा काहीच ठावठिकाणा लागला नव्हता. अल्पवयीन असल्याने अज्ञात व्यक्तीने फूस लावून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाल करत तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, नातेवाईक व मित्रपरिवाराकडे चौकशी, तसेच गोपनीय माहितीदारांच्या मदतीने विविध पथके सक्रिय करण्यात आली. या समन्वित तपासामुळे अवघ्या १२ तासांत मुलीचा ठावठिकाणा लागला.
सदर बेपत्ता मुलगी ही सुरक्षित अवस्थेत मिळून आली असून तिच्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी मंद्रूप पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. शंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, श्रेणी उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण आणि पोलीस कॉन्स्टेबल अश्पाक मियावाले यांनी पार पाडली.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

0 Comments