🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..!
रानयात्री: कवी डॉ. रामनाथ जऱ्हाड
जो माणूस रानात रमतो
चाफा त्याच्या मनात फुलतो
असं लिखाण करणारे लोकप्रिय निसर्गकवी आणि 'आंतरराष्ट्रीय आशिया सांस्कृतिक साहित्य' पुरस्काराने गौरवण्यात आलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ.रामनाथ जऱ्हाड सर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त रवी देवकर यांनी दिलेल्या मनापासून मनापर्यंतच्या शब्दशुभेच्छा..!
कवी रामनाथ हे धनगर समाजाचे. त्यामुळे शेती आणि मेंढपाळ हा त्यांचा प्रमुख व्यवसाय. त्यामुळे रानयात्री या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज-हाड सरांनी शेती, शेतकरी मेंढरं,वावर, पक्षी, पाळीव प्राणी या संसाधनांवर विपुल लेखन केले आहे. 'रान' हा त्यांचा श्वासच जणू... लहानपणापासून आई-वडील, मामा यांच्याबरोबर फिरून रानाची ओढ लागली ती कायमची ऊर्मी देणारी ठरली. त्यामुळे सरांचा मेंढपाळ व शेतीच्या अभ्यासाचा पाया हा असा लहानपणीच रचला. त्यांचा जन्म अहिल्यानगर जिल्हा, तालुका संगमनेर येथील आश्वी( बु.) या गावी 5 एप्रिल रोजी झाला.
'धनगर माळावर चारीतो मेंढर..' अशा पुस्तकातून 5000 पेक्षा जास्त कवितेतून रान व मेंढरं या विषयावर लिखाण केले आहे. मराठी साहित्यविश्व अनेक साहित्यप्रभूंच्या योगदानाने समृद्ध झाले आहे. त्यापैकी डॉ. रामनाथ जन्हाड हे एक लोकप्रिय कवी आहेत.
'माझे माहेर शिवार ' ... या कवितेमध्ये कवी जऱ्हाड लिहितात...
शिवाराच माझ माहेर
माळरान सासर
माय माझी दुभती गाय
मेंढरच माझी लेकरं
या कवितेत धनगर समाजाच्या व्यथांचे प्रश्न आणि त्या प्रश्नांमध्येच असणारी उत्तरं, अशा दुःख व्यथांचा ओघ माळरानात मेंढरांबरोबर मेंढपाळांची पाठ सोडायला तयार नाही. सालभर शिवारातच भटकंती करायची. त्यातून कुटुंबाची झालेली फरफट. एकवेळ लेकरं उपाशी राहिली तरी चालेल पण कोकरांना तोंड टेकवण्यापुरतं का होईना हिरवं रान शोधायचं... हा ध्यास मेंढपाळाला स्वस्त बसू देत नाही..
'भगव्या सोबती पिवळा'... या कवितेत ते लिहितात...
आता नको कोरडी आश्वासने
निर्णय हवा ठोस
नाहीतर झेंडा पिवळा आहे
साम्राज्य पाडील ओस
अशी धारदार वाक्ये पुस्तकात वाचायला मिळतात. तुम्ही जर त्यांची पुस्तके वाचली तर तुम्हालाही हा धागा नक्की गवसेल. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जगणे त्यांच्या व्यथा संघर्ष आणि संस्कृती अत्यंत प्रभावीपणे काव्यरूपात मांडले आहे. त्यामुळे त्यांच्या कथा व कविता ग्रामीण साहित्यातील मैलाचा मानल्या जातात. पुस्तकातील भाषा ग्रामीण आहे. मनाला भिडणारी आहे. त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील केलेल्या योगदानाबद्दल आजतागायत त्यांना 500 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची मी दोन व्याख्याने ऐकले. त्यांच्या व्याख्यानाची पद्धत म्हणजे मनोगत व्यक्त करतान गद्यापेक्षा पद्याचा म्हणजे कवितेचा जास्त वापर करतात. त्यांच्या या शब्दशक्तीच्या अफाट ताकदीचा तो विलक्षण आविष्कार पाहून मी भारावून गेलो.
साहित्यिक तसेच सामाजिक क्षेत्रात काम करीत पत्रकारिता क्षेत्रात डॉ. रामनाथ जऱ्हाड यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली. 'महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघ'.. स्थापन करून ग्रामीण पत्रकारांसाठी कार्यशाळा घेतल्या. तरुण पत्रकारांना घडवण्याचे काम त्यांनी निस्वार्थपणे केले. त्यांच्या या कार्याला सलाम !
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!


0 Comments