Advertisement

Breaking News
Loading...

जनसेवेचा वसा आणि शिक्षकांचा आधार शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर...

 


जनसेवेचा वसा आणि शिक्षकांचा आधार शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर...


एखादा शिक्षकांचा लोकप्रतिनिधी केवळ शब्दांनी नाही तर आपल्या कृतीतून लोकांचा विश्वास कसा जिंकू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर.

शिक्षक आणि कर्मचारी मित्रांनो विश्वास कोणावर ठेवावा?

मी आज साक्ष देत आहे एका अशा नेतृत्वाची ज्यांनी केवळ आश्वासने दिली नाहीत तर ती कृतीत आणून दाखवली आहेत. शनिवार दि. 28 मार्च 2026 रोजी एका बाजूला कांचन सरांच्या सेवानिवृत्तीचा भावनिक क्षण होता तर दुसरीकडे विनाअनुदानित शाळेतील हजारो शिक्षकांच्या आयुष्याला कलाटणी देणारी मोठी घडामोड झाली.

शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी शिक्षण आयुक्त साहेबांशी थेट संवाद साधून विनाअनुदानित ते अनुदानित बदली प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मार्गी लावला. हा केवळ निर्णय नाही तर शेकडो शिक्षकांच्या जीवनात स्थैर्य आणणारा प्रकाश आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने होणार असून मान्यता आणि शालार्थ आयडी देखील ऑनलाईन मिळणार आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसून कामात पारदर्शकता येईल, हा विश्वास सरांनी दिला आहे. 

कांचन सरांच्या सेवानिवृत्ती समारंभाला उपस्थित राहून त्यांना सन्मानाने निरोप देणे असो किंवा टप्प्यावरील शाळांचा निधी वितरित करून घेणे असो सावंत सर नेहमीच अग्रभागी असतात. कांचन सरांच्या सेवानिवृतीचा कार्यक्रम आटोपून संचालक कार्यालयात जावून टेबल टू टेबल फिरून शिक्षकांचे पगार झाले पाहिजेत, थकीत वेतन निघाले पाहिजे, टप्प्यावरील शिक्षकांना वेतन मिळाले पाहिजे यासाठी केलेला पाठपुरावा अशा महत्वपूर्ण निर्णयाचे आणि त्यांच्या धडपडीचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. टप्प्यावरील शाळांचा रखडलेला निधी आपल्या सक्रिय पाठपुराव्यातून वितरित करून घेतला.

शब्द नसतात ही केवळ, ही तर कार्याची गाथा आहे.

     शिक्षक बांधवांच्या स्वप्नांना, सावंत सरांची साथ आहे.

     नाही केवळ राजकारण, हे तर संघर्षाचे यश आहे.

     पुन्हा एकदा त्यांना निवडून देणे, हीच आता गरज आहे.

मी का म्हणतोय सावंत सरांनाच मत द्या??

कारण त्यांनी हे सिद्ध केले की, पदावर नसतानाही ते शिक्षकांच्या पाठीशी खंबीर उभे राहू शकतात. सावंत सरांच्या मनात शिक्षकांसाठी किती आदर आहे, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. ते आपले एक प्रामाणिक आणि सत्तेच्या वाटेने जाणारे सहकारी आहेत. ज्यांना प्रत्येक शिक्षकाची अडचण आणि भावना समजते.

  रखडलेली कामे मार्गी लावली, अन्यायाला दिला छेद, 

     स्वच्छ कारभाराचा त्यांनी, प्रस्थापित केला भेद, 

     आजची साक्ष ही, उद्याच्या उज्वल भविष्याची, 

     सावंत सरांना साथ देऊया, ताकद वाढवूया शिक्षकांची! 

       सर्व शिक्षक बंधूभगिनींनो चुकीच्या लोकांच्या हातात अधिकार देऊन पुन्हा पश्चाताप करण्यापेक्षा, ज्यांनी आपल्या कष्टाची किंमत ओळखली, ज्यांनी ऑनलाईन प्रक्रियेसारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपले प्रश्न सोडविले, रस्त्यावरची लढाई लढली अशा अनुभवी नेतृत्वाला आपण पुन्हा संधी दिली पाहिजे. 

    'येणाऱ्या निवडणुकीत दत्तात्रय अच्युतराव सावंत सर यांच्या नावावर समोर पसंती क्र.( १ ) टाकून त्यांना विजयी करूयात.' 

    'त्यांचे कामच त्यांचा जाहीरनामा आहे.'



       आपलाच...

 राजेंद्र महादेव आसबे.

सहशिक्षक:- साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तावशी.

संपर्कप्रमुख:- महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती पुणे जिल्हा.

संचालक:-सोलापूर जिल्हा कृती समिती मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था, पंढरपूर.

जिल्हाध्यक्ष:- सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ, सोलापूर.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

Post a Comment

0 Comments