Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूरला नवे जिल्हाधिकारी; एस. कार्तिकेयन यांची नियुक्ती...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय नेतृत्वात महत्त्वाचा बदल झाला असून विद्यमान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली नागपूर येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांची सोलापूरच्या नव्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार हा बदल करण्यात आला असून, सोलापूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याची जबाबदारी आता एस. कार्तिकेयन यांच्या खांद्यावर आली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची प्रशासकीय क्षमता सिद्ध झाली असून, सोलापूरमध्येही विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, कुमार आशीर्वाद यांनी आपल्या कार्यकाळात विविध विकासकामे आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्यावर भर दिला होता. त्यांच्या बदलीमुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

नवे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन लवकरच पदभार स्वीकारणार असून, आगामी काळात जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न आणि विकास योजनांना गती देण्यावर त्यांचा भर राहणार आहे.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

Post a Comment

0 Comments