सोलापूर (ता. मोहोळ)/ हॅलो रिपोर्टर न्यूज / मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : ऊस बिल थकबाकीवरून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर गोकुळ शुगर धोत्री या कारखान्याने अखेर माघार घेत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. डिजिटल शेतकरी संघटना, शिरापूरचे संस्थापक अध्यक्ष अनिल अबाजी पाटील यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कारखान्याकडून थेट लेखी पत्र देण्यात आले आहे.
कारखान्याचे प्रतिनिधी उमेश पवार यांनी दिलेल्या पत्रानुसार, सन 2025-26 गळीत हंगामातील ऊस बिल दिनांक 20 एप्रिल ते 25 एप्रिल 2026 दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी शेतकऱ्यांचे ऊस बिल थकीत राहिल्यामुळे संतप्त झालेल्या अनिल पाटील यांनी 02 एप्रिल रोजी कारखान्याच्या चिमणीवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनात खळबळ उडाली होती.
शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने हा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र, आता कारखान्याने लेखी आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, कारखान्याने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण होते का, याकडे आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

0 Comments