Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूर जिल्हा परिषद ‘स्वीकृत सदस्य’ निवडीवर राजकीय घडामोडींना वेग; भाजपमध्ये जोरदार चुरस..!

 


मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि सभापती निवडीची प्रक्रिया पूर्ण होताच आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष ‘स्वीकृत सदस्य’ निवडीकडे केंद्रित झाले आहे. विशेषतः मोहोळ तालुक्यात या पदासाठी भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू असून, इच्छुकांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.

प्रबळ दावेदारांमध्ये रंगतदार स्पर्धा...

विकास वाघमारे:

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले वाघमारे सध्या आघाडीवर मानले जात आहेत. भाजपचे जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत असलेले वाघमारे हे पक्षाचे निष्ठावान आणि ‘तरुण चेहरा’ म्हणून चर्चेत आहेत.

प्रा. प्रमोद आवताडे:

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे प्रा. आवताडे यांचे नाव चर्चेत आहे. मागील काही राजकीय समीकरणांमुळे संधी हुकल्यानंतर यावेळी त्यांना संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शंकरराव वाघमारे:

भाजपचे ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्ते तसेच माजी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचा पक्षात मोठा प्रभाव आहे. जुन्या कार्यकर्त्यांच्या गटातून त्यांच्या नावाला जोरदार पाठिंबा मिळत आहे.

रामदास चवरे यांच्या पुनर्वसनासाठी दबाव:

पेनूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवलेले रामदास चवरे यांना ‘लोकनेते’ बाळराजे पाटील समर्थकांकडून स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्याची मागणी पुढे येत आहे. निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना स्थान द्यावे, असा आग्रह वाढत आहे.

पक्षांतर्गत गटबाजी निर्णायक ठरणार?

माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांच्या नेतृत्वाखालील गटाने यापूर्वी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. आता स्वीकृत सदस्य निवडीत कोणत्या गटाला प्राधान्य मिळते आणि कोणाचे राजकीय वजन वाढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सोलापूर जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य निवड ही केवळ औपचारिकता नसून, आगामी स्थानिक राजकारणाचे समीकरण ठरवणारी निर्णायक प्रक्रिया ठरणार आहे. भाजपमधील अंतर्गत स्पर्धेमुळे या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!


Post a Comment

0 Comments