Advertisement

Breaking News
Loading...

वटवटे येथील जकराया साखर कारखान्याविरोधात अनिल पाटलांचा इशारा – 6 एप्रिलपासून करणार बेमुदत अन्नत्याग आंदोलन...

 


मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ.राजदत्त रासोलगीकर : मोहोळ तालुक्यातील वटवटे परिसरातील जकराया साखर कारखाना यांच्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले न दिल्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून, येत्या 6 एप्रिल 2026 पासून कारखान्यासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

डिजीटल शेतकरी संघटना, शिरापूर (सो) चे संस्थापक अध्यक्ष अनिल अबाजी पाटील यांनी साखर आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत पत्रकारांशी बोलताना ही भूमिका स्पष्ट केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, एफ.आर.पी. (Fair and Remunerative Price) नियमानुसार ऊस गळीतास गेल्यानंतर 14 दिवसांत पहिला हप्ता देणे बंधनकारक असतानाही कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर बँक व पतसंस्थांचे कर्ज वाढत असून, अनेकांचे CIBIL स्कोअर खराब होण्याची वेळ आली आहे.

याशिवाय, शेतकऱ्यांच्या मुलींची लग्ने जवळ आलेली असून, त्यासाठीचा खर्च ऊसाच्या बिलावर अवलंबून आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत.

शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, थकीत ऊस बिले तात्काळ व्याजासह अदा करावीत, अन्यथा 6 एप्रिलपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येईल...

तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणीही करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!


Post a Comment

0 Comments