मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | अष्टे परिसरातील घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला गेला असून सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांच्या पुढाकारातून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. अष्टे, भांबेवाडी, शिरापूर, हिंगणी, भोयरे आणि कोळेगाव या गावांतील सर्व घरकुल लाभार्थ्यांना आता मोफत वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या संदर्भात आज करण्यात आलेल्या आंदोलनानंतर माननीय तहसीलदार साहेबांनी आदेश दिले असून गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित सर्व ग्रामसेवकांना तात्काळ वाळू पास देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रत्येक लाभार्थ्याने उद्या आपल्या ग्रामसेवकांकडे जाऊन वाळूचा पास घ्यावा.
शुक्रवार, दिनांक २२ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता अष्टे बंधाऱ्यातून प्रत्येक लाभार्थ्याला ३ ब्रास वाळू तात्काळ उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सर्व लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपले घरकुल काम गतीने पूर्ण करावे, असे आवाहन अनिल आबाजी पाटील यांनी केले आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!


0 Comments