Advertisement

Breaking News
Loading...

राष्ट्रसंत प्राथमिक शाळा व विश्वभूषण विद्यालयाला आमदार देवेंद्र (दादा) कोठे यांची सदिच्छा भेट; शैक्षणिक विकासासाठी मदतीचे आश्वासन...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. देवेंद्र (दादा) कोठे यांनी राष्ट्रसंत प्राथमिक शाळा आणि विश्वभूषण विद्यालयास सदिच्छा भेट देत शाळेच्या शैक्षणिक व संस्थात्मक कार्याची माहिती घेतली.

यावेळी आमदार कोठे यांनी शाळेतील शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली. शाळेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी शिक्षण क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले.

तसेच शाळा व संस्थेच्या विकासासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन आमदार देवेंद्र (दादा) कोठे यांनी दिले. त्यांच्या भेटीमुळे शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

याप्रसंगी राष्ट्रसंत प्राथमिक शाळा व विश्वभूषण विद्यालयाच्या वतीने आमदार देवेंद्र (दादा) कोठे यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि कर्मचारी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments