Advertisement

Breaking News
Loading...

झपूर्झा कला दालनात मूकबधिर विद्यार्थ्यांचा रंगमय अनुभव; गार्डन लव्हर्सकडून ₹5 हजारांची देणगी, रंगसाहित्याचेही वाटप...


 

सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दमाणी नगर येथील राधाकिशन फुमरा मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज पू. ना. गाडगीळ यांच्या 'झपूर्झा' कला दालनाला भेट देत चित्रकलेचा अनोखा अनुभव घेतला. यावेळी प्रसिद्ध चित्रकार विद्या गोसावी यांच्या निसर्गचित्रे व वस्तूचित्रांच्या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांना विशेष आकर्षित केले.

सुमारे २० मूकबधिर विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहिले. प्रदर्शनातील प्रत्येक चित्रामागील संकल्पना व वैशिष्ट्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषेत समजावून सांगितली. त्यामुळे विद्यार्थ्यांना चित्रकलेतील सौंदर्य आणि कलाविष्काराचा आनंद अनुभवता आला.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना रंगकामासाठी रंगपेटी व चित्रकलेच्या वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच गार्डन लव्हर्सचे संस्थापक राजस शहा यांनी राधाकिशन फुमरा मूकबधिर संस्थेला ₹५,००० ची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली.

कला, शिक्षण आणि सामाजिक संवेदनशीलतेचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.



Post a Comment

0 Comments