Advertisement

Breaking News
Loading...

🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..!...सहकार्य, समर्पण आणि कार्यतत्परतेचा आदर्श – काकासाहेब जगताप सर...

 


🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..!

कार्यक्षमता म्हणजे काय आणि ती प्रत्यक्ष कृतीतून कशी साकारली जाते, हे पाहायचे असेल तर काकासाहेब जगताप सर यांच्या कार्यशैलीकडे पाहावे लागेल.

नुकतेच सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग आणि सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय मराठी व्याकरण कार्यशाळा तसेच जिल्हा पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करण्यासाठी जगताप सरांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध कामाची, समन्वय कौशल्याची आणि कार्यतत्परतेची प्रचिती माझ्यासह उपस्थित सर्व शिक्षकांना आली.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथील श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गुणवंत सहशिक्षक, तसेच सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य काकासाहेब जगताप सर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने शाळेत आणि अध्यापक मंडळात स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे.

अशा कर्तृत्ववान, अभ्यासू आणि सहकार्यशील काकासाहेब जगताप सर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! मराठी भाषा, शिक्षण आणि सामाजिक सेवेत त्यांची कारकीर्द अधिकाधिक देदीप्यमान होत राहो. त्यांनी हाती घेतलेल्या सहकार्याच्या व्रताला अधिक बळ लाभो, त्यांच्या सर्व संकल्पांना यश लाभो आणि त्यांना निरोगी, आनंदी व उदंड आयुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

– शुभेच्छुक : रवी देवकर सर



Post a Comment

0 Comments