सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग पुरस्कृत आणि सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक मंडळ यांच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी शुक्रवार,दि. 10 जुलै रोजी सकाळी 9:30 ते 5:30 या वेळेत पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील सिंहगड इन्स्टिट्यूट या महाविद्यालयात मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आसबे यांनी दिली.
या कार्यशाळेत अहिल्यानगर येथील व्याकरण तज्ञ रंगनाथ सुंबे हे 'इयत्ता पाचवी ते दहावी तसेच टी ई टी परीक्षेतील 'मराठी व्याकरण' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय मराठी विषयात अध्यापन करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय याविषयी ही चर्चा होणार आहे. दुपारच्या सत्रात पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील मराठी विषय शिकविणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा जिल्हास्तरीय आदर्श मराठी शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
दुपारच्या वेळी अध्यापक मंडळाच्यावतीने अल्पोपहार व चहापाणी याची सोय करण्यात आली आहे. या कार्यशाळेस उपस्थित राहणाऱ्या सर्व शिक्षकांना उपस्थित पत्रक देण्यात येणार आहे. जेणेकरून हा दिवस सेवाकाळ रजा म्हणून हजेरी पत्रकावर नोंदवली जाणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील मराठी विषय शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहावे,असे आवाहन सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे सचिव मुख्याध्यापक शशिकांत उपासे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माळी,सुभाष भीमणवरु, सहसचिव रंगसिद्ध कोरे, कोषाध्यक्ष शिवाजी कौलगे, रवी देवकर, उज्ज्वला साळुंके, वैशाली अघोर, काकासाहेब जगताप, अमोघसिद्ध देशमुख, निलेशकुमार टोणपे, स्मिता ढगे, सारिका सूर्यवंशी, महेश तांबुळकर, संगप्पा आळगी, दयानंद चिकणे, सुनील बनसोडे आदींनी केले आहे. या कार्यशाळेत सोलापूर जिल्ह्यातील मराठी विषय शिकवणारे एकही शिक्षक वंचित राहणार नाही असे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या आदेशाने सर्व शाळांना कळविले आहे.


0 Comments