Advertisement

Breaking News
Loading...

"‘चिट्टीशिवाय पेमेंट नाही!’ मंद्रूपसह सहा गावांत मटका जुगाराचा सुळसुळाट; बुकींकडून दुकानातच फलक"... मंद्रूप, टाकळी, भंडारकवठे, निंबर्गी, वांगी व कंदलगावमध्ये खुलेआम मटका; पोलिसांच्या कारवाईची नागरिकांची मागणी...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप, टाकळी, भंडारकवठे, निंबर्गी, वांगी आणि कंदलगाव परिसरात मटका जुगार खुलेआम सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या अवैध व्यवसायामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, "चिट्टी शिवाय पेमेंट मिळणार नाही" असा फलक थेट मंद्रूप येथील दुकानात लावण्यात आल्याचे दिसून आले आहे. यावरून मटका व्यवहार किती बिनधास्तपणे सुरू आहेत, याची चर्चा परिसरात रंगली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बुकी कोणत्याही भीतीशिवाय मटका व्यवसाय चालवत असून व्यवहार खुलेआम सुरू आहेत. त्यामुळे तरुण पिढी या अवैध धंद्याकडे आकर्षित होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी संबंधित पोलीस प्रशासनाने तातडीने धाडसत्र राबवून मटका बुकींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, या अवैध व्यवसायाला अभय देणाऱ्यांचाही शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


(छायाचित्र : मंद्रूप येथे मटका व्यवहाराच्या ठिकाणी लावण्यात आलेला "चिट्टी शिवाय पेमेंट मिळणार नाही" असा फलक.)


Post a Comment

0 Comments