सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही; मात्र महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघातील अन्यायग्रस्त शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात सोने करण्याचे काम यापूर्वीही केले आहे आणि यापुढेही करत राहणार आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने आयोजित अक्कलकोट तालुका मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश शिंदे व रमेश लोखंडे, राज्य कोषाध्यक्ष नीलकंठ शिंगे, जिल्हा सचिव रवी देवकर, जिल्हा सहसचिव डॉ. राजदत्त रासोलगीकर आदी प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर अन्यायग्रस्त शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आपापले प्रश्न मांडले. यावेळी राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश शिंदे व रमेश लोखंडे, रवी देवकर, दत्तात्रय शिंदे, राम गायकवाड आणि शिवाजी जगताप यांनी अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी महासंघ कटिबद्ध असल्याची भूमिका आपल्या मनोगतातून स्पष्ट केली.
या मेळाव्यात विश्वभूषण प्रशालेचे मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे, मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील कै. शहाजीराव पाटील विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक नागनाथ गायकवाड तसेच सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक मंडळाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित गुरुनाथ कणगी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्तीनिमित्त सावकार कारंडे आणि तुकाराम दुपारगुडे यांचाही गौरव करण्यात आला.
मेळाव्याचे प्रास्ताविक राज्य कोषाध्यक्ष नीलकंठ शिंगे यांनी केले. सूत्रसंचालन अक्कलकोट तालुका कोषाध्यक्ष जयदीप गायकवाड यांनी केले, तर आभार तुकाराम दुपारगुडे यांनी मानले.
यावेळी अक्कलकोट तालुका सचिव सिद्राम मुली, संदीप निस्ताने, भोजराज गायकवाड, श्रीकांत चौधरी, राजेंद्र सरोटे, प्रा. अभिजित भंडारे, सिद्धेश्वर भुरले, इन्नुस बाळगी, एकोराम चौगुले, शिवानंद चौगुले, भागवत देवकुळे आदी उपस्थित होते.
मेळावा यशस्वी करण्यासाठी राहुल हिप्परगी, शामसुंदर गायकवाड, नितीन तळवार, संजय बनसोडे, सर्जेराव माशाळे, भाईदास कोकणी, मनीषा बाळकोटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.






















0 Comments