मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर | जागेच्या साफसफाईच्या कामात अडथळा आणून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मंद्रूप येथील दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघेश महादेव म्हेत्रे आणि रवि महादेव म्हेत्रे अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास मंद्रूप येथील ग्रामपंचायत मिळकत क्रमांक १५७३ मध्ये फिर्यादी रवींद्र आडवेळप्पा कांबळे (वय ३३) हे आपल्या काका व चुलत भावांसह साफसफाईचे काम करीत होते. यावेळी आरोपींनी दुचाकीवरून येऊन कामात अडथळा आणला. तसेच फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ करून कुऱ्हाडीने मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
याप्रकरणी २५ ऑक्टोबर रोजी रात्री मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३५१(२), ३५१(३), ३५२, ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून, सोलापूर उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप पुढील तपास करीत आहेत.


0 Comments