Advertisement

Breaking News
Loading...

हत्तुर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ₹३.७५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन...

 

दक्षिण सोलापूर, दि. ७ नोव्हेंबर:

दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तुर येथील श्री सोमेश्वर व बनसिद्धेश्वर मंदिर देवस्थान येथे एकूण ₹३ कोटी ७५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमारजी गोरे यांच्या शुभहस्ते पार पडले.



या कार्यक्रमात हत्तुर व दक्षिण सोलापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. या विकासकामांत मंदिर परिसराचे सुशोभीकरण, मूलभूत सोयीसुविधांचा विकास, रस्ते दुरुस्ती, पायाभूत सुविधा तसेच ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयुक्त अशा अनेक योजनांचा समावेश आहे.



अलीकडील अतिवृष्टीमुळे हत्तुर ते आनंदनगर तांडा या मार्गावरील रस्ता वाहून गेला होता, ज्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यावर उपाय म्हणून पालकमंत्री गोरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या रस्त्यावर पूल बांधण्यासाठी 'देखभाल-दुरुस्ती ३०-५४' अंतर्गत ₹१ कोटी ९० लाख रुपयांची प्राथमिक मंजुरी दिली आहे.



कार्यक्रमास तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, सोनियाताई गोरे, शिलीसिद्ध पटेवडियार महाराज, रोहिणीताई तडवळकर, राजू कुलकर्णी, रंजिताताई चाकोते, धर्मा राठोड, संदीप कोहिणकर, सूर्यकांत भुजबळ, अप्पासाहेब मोटे, नरेंद्र खराडे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments