सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापूर शहरातील आर.टी.ओ. ऑफिस रोडवरील समर्थ ज्वेलर्स दुकानात पिस्तूल व कोयत्याच्या धाकावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेच्या पथकाने सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
🕖 घटना:
दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तीन इसमांनी समर्थ ज्वेलर्स दुकानात घुसून “सोन्याचे दागिने बॅगेत भरा” अशी दमदाटी केली. एका आरोपीने हातातील कोयत्याने काचेचा काउंटर फोडला. मात्र दुकान मालक दिपक वेदपाठक आणि कर्मचाऱ्यांच्या आरडाओरडीनंतर चोरटे निळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून पसार झाले.
या प्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेने वेगवेगळ्या तपास पथकांमार्फत सुमारे १२५ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
🔍 कारवाई:
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी यतीमखाना परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. पुढील चौकशीत त्यांनी आपल्या साथीदारांची नावे सांगितली. या टोळीने दरोडा टाकण्यापूर्वी आर.टी.ओ. रोडवरील समर्थ ज्वेलर्स दुकान लुटण्याचा कट रचल्याचे समोर आले.
🔫 अटक आरोपी:
1️⃣ साहिल दशरथ गायकवाड (वय २०, रा. लिमयेवाडी, सोलापूर)
2️⃣ समर्थ समीर गायकवाड (रा. भैरू वस्ती, सोलापूर)
3️⃣ सार्थक दशरथ गायकवाड (रा. विठ्ठल मंदिर जवळ, सोलापूर)
4️⃣ अजिंक्य चव्हाण (रा. वारजे माळवाडी, पुणे)
5️⃣ विशाल जाधव (रा. तुळजापूर, जि. धाराशिव)
6️⃣ अनिकेत पांडुरंग गायकवाड (रा. सोलापूर)
तसेच एका विधी संघर्षीत बालकाचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
🚔 जप्त माल:
पोलिसांनी आरोपींकडून एक लोखंडी कोयता, बजाज प्लॅटिना मोटारसायकल, मोबाईल फोन आणि अॅक्टीव्हा स्कूटर असा मुद्देमाल जप्त केला आहे.
💥 पूर्वीचे गुन्हे:
आरोपी समर्थ गायकवाड व अजिंक्य चव्हाण या दोघांनी यापूर्वी होटगी रोडवरील चौधरी फिलिंग सेंटरवर पिस्तूलच्या धाकावर ३९ हजार रुपयांची लूट केल्याचेही उघड झाले आहे.
🏅 पोलीसांची कामगिरी:
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, उप-आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, शंकर धायगुडे, विजय पाटील, निलेश पाटील-सोनवणे, तुकाराम घाडगे, दत्तात्रय काळे आणि मुकेश गायकवाड यांनी केली.
👉 सोलापुरातील नागरिकांनी सावध राहून संशयास्पद हालचालींची तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

0 Comments