Advertisement

Breaking News
Loading...

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर; १२३ जणांना चष्मे वाटप, ७६ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया... चन्नवीर चिट्टे मित्र परिवार व लायन्स क्लब यांचा संयुक्त उपक्रम...

 


सोलापूर शहर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: लोकनेते स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त चन्नवीर चिट्टे मित्र परिवार व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर भवानी पेठ येथील रेवणसिद्धेश्वर सांस्कृतिक भवन येथे उत्साहात संपन्न झाले.



शिबिराचे उद्घाटन श्री छत्रपती स्मारक मंडळाचे (शिवस्मारक) अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते भिमाशंकर पदमगोंडा, संजय होमकर, भाजयुमो शहराध्यक्ष विजय कुलते, मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, जयवंत थोरात, सतिष पारेल्ली, नागेश ताटी यांसह मान्यवर उपस्थित होते.



उद्घाटन प्रसंगी बोलताना बंकापूर म्हणाले, “स्व. मुंडे साहेबांच्या कार्याची प्रेरणा घेऊन चन्नवीर चिट्टे मित्र परिवार सतत सामाजिक उपक्रम राबवतो. कुणाकडूनही एक रुपया न घेता हे मंडळ स्वखर्चातून सेवा करते, हे अनुकरणीय आहे.”



चन्नवीर चिट्टे यांनी प्रस्तावना सादर करत मित्र परिवाराच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचा आढावा घेतला. गरीब-गरजूंसाठी सामाजिक बांधिलकी जपत पुढेही असे उपक्रम राबवत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विजय कुलते व अक्षय अंजिखाने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.



या शिबिरात एकूण २८५ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी १२३ लाभार्थ्यांना जागेवरच मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तपासणीनंतर निवड झालेल्या ७६ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यास १६ डिसेंबरपासून सुरुवात होईल, अशी माहिती लायन्स क्लबचे जनसंपर्क अधिकारी सुवर्णा काळे व शीतल गायकवाड यांनी दिली.



लायन्स नेत्रालयातील नेत्रतज्ञ महासिद्ध म्हमाने व राहुल येमूल यांनी रुग्णांची तपासणी करून सेवा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर अतनुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सद्दाम कोसगीकर यांनी मानले.


Post a Comment

0 Comments