Advertisement

Breaking News
Loading...

सिंदखेड परिसरातील शेतीला 2 महिन्यांपासून वीजपुरवठा बंद; शेतकरी हवालदिल, तातडीने वीज दुरुस्तीची मागणी...

 


सिंदखेड (ता. दक्षिण सोलापूर) हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: नुकत्याच आलेल्या भीषण महापुरातील वेगवान पाण्याच्या प्रवाहात सीना नदीकाठी असलेले शेती वीजपुरवठ्याचे पोल पडल्याने अजूनही सिंदखेड, चंद्राळ, हत्तुर, राजूर, बिरनाळ, होनमुर्गी, औराद, सांजवड, वांगी, वडकबाळ, हत्तरसंग व कुडल या गावांमध्ये शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प आहे. महापुराला दोन महिने उलटूनही वीजपुरवठा न सुरु झाल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.



महापुरात पिकांचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा वीजपुरवठा ठप्प असणे म्हणजे ‘दु:खावर आणखी घाव’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. रब्बी पिकांसाठी आवश्यक असलेले पाणी, जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि चाराच्या गरजा पूर्ण करण्यात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

महावितरणकडून अद्याप नवे पोल उभारण्याचे किंवा तुटलेल्या लाईन दुरुस्त करण्याचे काम वेगाने सुरू न झाल्याने शेतकरी संतापले आहेत. तातडीने वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे.

"महापूराला दोन महिने होत आले, पण अजूनही शेतीकाठी वीजपुरवठा सुरू केला नाही. जनावरांना पाणी नाही, पिकांचा ऱ्हास होत आहे. तातडीने पोल उभे करून शेतीपंपांना वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल." — ईराण्णा विजापुरे, शेतकरी, सिंदखेड (ता. दक्षिण सोलापूर)


Post a Comment

0 Comments