Advertisement

Breaking News
Loading...

मेव्हण्याच्या रागाचा रक्तरंजित शेवट: वडापूरमध्ये पत्नीची कोयत्याने वार करून निघृण हत्या...

 


दक्षिण सोलापूर ( हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे): अनैतिक संबंधाच्या संशयावरून मेव्हण्याने आपल्या पत्नीची उसाच्या शेतात कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना वडापूर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 429/2025 भा.न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी दादागोंड महादेव कट्टीमणी (रा. सातपूर, ता. इंडी, जि. विजापूर – कर्नाटक) यांनी दिलेल्या तक्रारीत, त्यांची बहिण सविता जकप्पा पुजारी (वय 35, रा. हत्ताळी, ता. चडचण, जि. विजयपुर – कर्नाटक) हिची तिच्या पतीनेच निर्घृण हत्या केल्याचे नमूद केले आहे.

घटनास्थळ दत्तात्रय गणेशकर यांच्या वडापूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील उसाच्या शेतात असून, 7 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 5 वाजण्यापूर्वी आरोपी जकप्पा मणगेरी पुजारी (रा. हत्ताळी, ता. चडचण, जि. विजयपुर) याने उसतोडणीच्या कोयत्याने पत्नीच्या डोक्यावर व गळ्यावर वार करून गंभीर जखमा केल्या. त्यात सविताचा जागीच मृत्यू झाला.

अनैतिक संबंधाच्या संशयामुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी पुढील तपास पीएसआय राज डांगे हे करीत आहेत.


Post a Comment

0 Comments