सोलापूर शहर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: मरीआई चौक येथील रेल्वे पूल जीर्ण झाल्याने तो पाडून त्याजागी नव्या पुलाच्या उभारणीला सुरुवात होत आहे. यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक ते मरीआई चौक हा मार्ग 9 डिसेंबर 2025 पासून 8 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी जारी केला आहे.
🚧 वर्षभर मोठा वाहतूक बदलीचा फेरा
नवीन पूल उभारणीसाठी संपूर्ण एक वर्ष वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. त्यामुळे शहर आणि बाहेरील मार्गावरील वाहनचालकांना मोठा फेरा मारावा लागणार आहे.
🛣 मंगळवेढा रोडकडील वाहतुकीसाठी नवीन दिशा
मंगळवेढा रोडवरून हैद्राबाद, तुळजापूर, विजापूर, पुणे दिशेला जाणारी वाहतूक:
➡ नवीन विजापूर रोड – केगाव बायपास मार्गे वळविण्यात आली आहे.
🏘 देगाव व दमाणी नगर रहिवाशांसाठी पर्यायी मार्ग...
शहरात येण्याजाण्यासाठी रहिवासी खालील मार्ग वापरतील...
➡ जगताप हॉस्पिटल – सी.एन.एस. हॉस्पिटल – जानकर नगर – नवीन रेल्वे बोगदा – अभिमानश्री नगर – अरविंदधाम वसाहत – जुना पुणा नाका.
🚦 पर्यायी मार्ग असे :
1️⃣ *मरीआई चौक ते एस.टी. स्टॅन्ड:
सर्व वाहनांसाठी :
➡ शेटेनगर रेल्वे बोगदा – खमीतकर अपार्टमेंट – एम.एस.ई.बी. ऑफिस – निराळे वस्ती – एस.टी. स्टँड – मरीआई चौक – शेटेनगर – छ. शिवाजी महाराज चौक.
2️⃣ मरीआई चौक ते रेल्वे स्टेशन:
सर्व वाहनांसाठी :
➡ मरीआई चौक – नागोबा मंदिर – रामवाडी – पोलिस चौकी – रामवाडी दवाखाना – मोदी बोगदा – जांबमुनी चौक – मोदी चौकी – कुमार चौक – रेल्वे स्टेशन.
वाहतूक विभागाने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले असून कामाचा कालावधी लक्षात घेता नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments