Advertisement

Breaking News
Loading...

महापालिकेचे ऑफिस की देशी दारूचा अड्डा? वर्षानुवर्षे सुरू असलेल्या गैरवापरावर अतिक्रमण विभागाचा धडक छापा..!

 


सोलापूर (हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी):  सोलापूर महापालिकेच्या कार्यालयाच्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून दारूचा अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या मालकीच्या या जागेचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारींना दुजोरा मिळाल्यानंतर अखेर अतिक्रमण विभागाने कारवाईची गाडी पुढे सरकवली.



अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी स्वतः संबंधित ठिकाणी छापा टाकत ही संपूर्ण बाब त्यांच्या निदर्शनास आणली. छाप्यात महापालिकेच्या जागेचा अनधिकृतरीत्या ‘डबल दारू’ विक्रीसाठी वापर होत असल्याचे उघड झाले. अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झालेल्या या अनियमिततेवर अखेर कारवाईचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

छापा टाकल्यानंतर संबंधित अनधिकृत कारभाराविरोधात पुढील प्रशासकीय पावले उचलली जाणार आहेत, अशी माहिती विभागातून मिळते. या संपूर्ण कारवाईचा महत्त्वाचा व्हिडिओही समोर आला असून तो पाहण्यासारखा आहे.

स्थानिक पातळीवर नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल न घेतल्याचा आरोप यापूर्वी करण्यात येत होता. मात्र आता अतिक्रमण विभागाने प्रत्यक्ष कारवाई केल्यानंतर महापालिकेच्या जागांचा वापर, नियंत्रण आणि सुरक्षितता याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Post a Comment

0 Comments