सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज
उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात कार्यरत निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत काशिनाथ हेडगिरे (वय ५२) यांना ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रंगेहाथ पकडले.
मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढून देण्यासाठी हेडगिरे यांनी सुरुवातीला ६० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून, तडजोडीनंतर ४० हजार रुपये ठरले. ही रक्कम स्वीकारत असतानाच ACBच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
कारवाईनंतर हेडगिरे यांना ताब्यात घेऊन सोलापूर शहरातील अँटी करप्शन कार्यालयात पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण कारवाई पुणे ACB पथकाने केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लक्षवेधी बाब म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी सोलापूर शहरात एका मंडलाधिकाऱ्याला ACBने पकडल्याची अफवा पसरली होती. ती अफवा ठरली असली तरी, त्यानंतर लगेचच उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातच प्रत्यक्ष कारवाई झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
👉 सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस; प्रशासनातील “लाच संस्कृती”वर ACBचा करारा प्रहार..!

0 Comments