Advertisement

Breaking News
Loading...

शैलजा सिद्धाराम जानकारांना भाजपकडून उमेदवारी हाच विजयाचा खात्रीशीर फॉर्म्युला...

 


दक्षिण सोलापूर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील निबर्गी पंचायत समिती गणातून शैलजा सिद्धाराम जानकर या केवळ इच्छुक नाहीत, तर त्या सर्वार्थाने प्रबळ, जिंकण्याची क्षमता असलेल्या आणि जमिनीवर काम करणाऱ्या उमेदवार आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने जर वास्तव परिस्थितीचा अभ्यास केला, तर विद्यमान सदस्य आणि इतर इच्छुक उमेदवारांबाबत मतदारांमध्ये असलेली प्रचंड नाराजी दुर्लक्षित करता येणार नाही. केवळ नावावर किंवा जुने राजकारण रेटून नेण्याची मानसिकता आता मतदारांनी साफ नाकारली आहे.



दक्षिण सोलापूर तालुक्यात शैलजा जानकर आणि सिद्धाराम जानकर हे नाव म्हणजे विश्वास, काम आणि थेट संपर्काचे प्रतीक बनले आहे. गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणे, महिलांच्या अडचणींसाठी ठाम भूमिका घेणे आणि शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे—या सगळ्या बाबतीत जानकर दाम्पत्याची कामगिरी इतर सर्वांपेक्षा उजवी ठरते.

आज भाजपसमोर स्पष्ट पर्याय आहे— नाराज, थकलेले चेहरे पुढे करायचे की जनतेच्या मनात घर केलेल्या शैलजा जानकर यांच्यावर विश्वास ठेवायचा. भाजपने जर खऱ्या अर्थाने विजयाची रणनीती आखली असेल, तर शैलजा जानकर यांना उमेदवारी देणे हाच एकमेव व्यवहार्य आणि यशस्वी मार्ग ठरेल.



त्यांना संधी मिळाल्यास त्या केवळ निवडणूक जिंकणार नाहीत, तर भाजपच्या तिकिटाला आणि मतदारांच्या विश्वासाला न्याय देत, निबर्गी गणात भाजपचा दणदणीत झेंडा रोवतील, यात तिळमात्र शंका नाही.

निंबर्गी पंचायत समिती गणातून भाजपच्या शैलजा सिद्धाराम जानकर यांना उमेदवारी मिळाल्यास त्याचा थेट फायदा हत्तूर जिल्हा परिषद गटातील भाजप उमेदवाराला होण्याची शक्यता असून, दोन्ही ठिकाणी संघटित मतांचे प्रभावी ट्रान्सफर होईल, अशी राजकीय जाणकारांची चर्चा आहे. मात्र निंबर्गी गणातून इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळाल्यास हत्तूर गटातही त्या पक्षालाच लाभ होणार असून, स्थानिक राजकारणाची दिशा त्याच अनुषंगाने ठरणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे.



Post a Comment

0 Comments