Advertisement

Breaking News
Loading...

संभाजी आरमार महिला आघाडीच्या जिल्हा नेतृत्वावर पल्लवीताई माने व ॲड. गीताताई पवार..

 


सोलापूर शहर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधीसंभाजी आरमार महिला आघाडीच्या जिल्हा नेतृत्वासाठी महत्वपूर्ण निवडी करण्यात आल्या असून, जिल्हाप्रमुखपदी पल्लवीताई माने यांची तर जिल्हा संघटकपदी ऍड. गीताताई पवार यांची निवड करण्यात आली आहे. संभाजी आरमार कार्यालयात झालेल्या बैठकीत या निवडी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आल्या.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील माता-भगिनींच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे, त्यांचे प्रश्न तडीस लावणे तसेच महिला सबलीकरणाच्या दिशेने ठोस उपक्रम राबविण्यासाठी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांकडून मोठी अपेक्षा व्यक्त होत आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी अधिक सक्षमपणे कार्यरत राहील, असा विश्वास संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments