Advertisement

Breaking News
Loading...

महापुरानंतर सीना काठचे पोल कोसळले; शेतकऱ्यांच्या तक्रारींवर महावितरणाविरोधात शिवसेनेचे निवेदन...

 

*दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे :* 22 ते 30 सप्टेंबर दरम्यान आलेल्या महापूरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. विशेषतः सीना नदीकाठच्या हत्तूर-चंद्रहाळ, सिंदखेड, राजूर, होनमुर्गी, बिरनाळ, औराद, बंदलगी या गावांमध्ये पिकांसह विद्युत संरचनांचे मोठे नुकसान झाले. नदीकाठी असलेले अनेक विद्युत पोल महापुराच्या जोरदार पाण्यात जमीनदोस्त झाले, परिणामी या भागांत विद्युत पुरवठा दीर्घकाळ पूर्णतः बंद राहिला.



या गंभीर परिस्थितीवर तात्काळ कार्यवाही न केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या वतीने महावितरण अधिकारी व ठेकेदारांवर भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचे आरोप करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बांधवांनी जुनी मिल कंपाऊंड येथील महावितरण अधिकारी गावडे यांना निवेदन देऊन सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.



निवेदन देताना उपस्थित मान्यवरांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, सिंदखेड सरपंच प्रतिनिधी भरमण्णा गावडे, कृष्णप्पा तळ्ळे, मल्लिनाथ विजापुरे, राजशेखर भुसारे, भिमाशंकर मोकाशी, अशोक भुसारे, शिवानंद पाटील, इरण्णा विजापूरे, संगप्पा आडके, रविंद्र इंगळे, वैजीनाथ मळेवाडी, शंकर पाटील, अनु पाटील, सिद्धाराम गवसने, संतोष अरबळे, मल्लिनाथ मोकाशी, अप्पा स्वामी, ताराचंद मळेवाडी, बाळासाहेब तळ्ळे, मारुती गायकवाड, विजु भुसारे, आनंद भुसारे, सिद्धाराम मोकाशी, अन्नपा पाटील, अशोक राठोड, दत्त तेली, मिलिंद भुसारे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.


Post a Comment

0 Comments