Advertisement

Breaking News
Loading...

धनेश आचलारे यांची शिवसेना जिल्हा उपप्रमुखपदी निवड...

 




दक्षिण सोलापूर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: बोरामणी पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे यांची शिवसेना (एकनाथ शिंदे गट) च्या जिल्हा उपप्रमुखपदी निवड करण्यात आली. शिवसेनेचे राज्य सचिव संजय मोरे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.



धनेश आचलारे हे गेली वीस वर्षे राजकारणात सक्रिय असून ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी राजकीय वाटचाल सुरू केली. पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी सामुदायिक विवाह, पोलीस ठाणे, आरोग्य सेवा, वीज वितरण कंपनी आदी कार्यालयांमध्ये नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या विस्तृत जनसंपर्क व संघटन कौशल्याचा पक्षाने विचार करून त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

या निवडीच्या वेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे, जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे, महिला लोकसभा प्रमुख अनिता माळगे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, अमोल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

🟥 चौकट:

पक्ष वाढवणार! “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात चांगली विकासकामे केली आहेत. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात तालुक्याचा विकास साधण्याबरोबरच शिवसेना पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे.”
— धनेश आचलारे, नूतन जिल्हा उपप्रमुख, शिवसेना


Post a Comment

0 Comments