Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूपमध्ये झालेल्या व्हॉलिबॉल स्पर्धेत सोलापूर आणि मंद्रूप संघाचे वर्चस्व...

 


दक्षिण सोलापूर हॅलो रिपोर्टर प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मंद्रूप येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात सोलापूर व्हॉलिबॉल संघाने, तर मुलींच्या गटात मंद्रूप माध्यमिक विद्यालय व्हॉलिबॉल संघाने विजेतेपद मिळवत चमकदार कामगिरी केली.

या स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते झाले. दक्षिण सोलापूर काँग्रेस युवक अध्यक्ष अनंत म्हेत्रे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती अशोक देवकते होते.

याप्रसंगी माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस शहराध्यक्ष गणेश डोंगरे, वाघेश म्हेत्रे, सिकंदरताज पाटील, राधाकृष्ण पाटील, मुख्याध्यापक अलियोद्दीन पाटील, सुरेश पाटील, जगन्नाथ खरात, अकिल कुडले, शिवानंद घाले, अमीर शेख, दत्ता पवार, जावेद शेख, किरण तोडकरी, गंगाधर बिराजदार, राहुल म्हेत्रे, मलकारी पुजारी, यतिष देशमुख, अमित देशमुख, साहिल बागवान, आरिफ नदाफ, जट्ट व्हनमाने, अमर मुल्ला, उमर मुलाणी, विष्णू व्हनमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत एकूण २५ संघांनी सहभाग नोंदवला.



स्पर्धेचा निकाल

मुले गट :

१️⃣ प्रथम – सोलापूर व्हॉलिबॉल संघ
२️⃣ द्वितीय – मंद्रूप माध्यमिक विद्यालय व्हॉलिबॉल संघ
३️⃣ तृतीय – मुलेगाव व्हॉलिबॉल संघ

मुली गट :

१️⃣ प्रथम – मंद्रूप माध्यमिक विद्यालय व्हॉलिबॉल संघ
२️⃣ द्वितीय – उर्दू माध्यमिक विद्यालय, मंद्रूप
३️⃣ तृतीय – मंद्रूप माध्यमिक विद्यालय व्हॉलिबॉल संघ


Post a Comment

0 Comments