सोलापूर शहर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी, दि. १६ : नामदेवराव (बापू) भालशंकर गौरव समिती, सोलापूर यांच्या वतीने नामदेवराव भालशंकर यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त ज्ञानवंत, प्रज्ञावंत, शीलवंत व गुणवंत मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा, तसेच मातोश्री रुक्मिणी फाऊंडेशन, सोलापूर यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणारे हुशार, होतकरू, गरजू व निराधार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप समारंभ, तसेच सम्यक अकॅडमी व लोकराजा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या संविधान गौरव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता शिवस्मारक सभागृह, नवी पेठ, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती गौरव समितीचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी दिली.
हा पुरस्कार वितरण सोहळा बाराव्या वर्षात प्रवेश करीत आहे. यावर्षीचे पुरस्कार पुढील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत.
तथागत भगवान गौतम बुद्ध धम्मरत्न पुरस्कार – आनंद जाधव (सरचिटणीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, अँटॉप हिल, मुंबई)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समतारत्न पुरस्कार – चंदाताई कासले (लेफ्टनंट जनरल, समता सैनिक दल, मुंबई)
राजर्षी शाहू महाराज जीवनगौरव पुरस्कार – दिलीपराव चौगुले (अध्यक्ष, नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार – डॉ. सुरेश कोरे (सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्ते)
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले समाजरत्न पुरस्कार – युवराज पवार (सामाजिक कार्यकर्ते)
राजर्षी शाहू महाराज उद्योगरत्न पुरस्कार – शंकर चौगुले (संस्थापक अध्यक्ष, बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सोलापूर)
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार – लाडजी बागवान (उपशिक्षक, जि.प. प्राथमिक शाळा, ता. अक्कलकोट)
राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार – मयूर प्रधान (वरिष्ठ सहाय्यक, शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे) व मनोहर कुंभार (सेवक, संघमित्रा माध्यमिक विद्यालय, कुडूवाडी, ता. माढा)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार – विश्वभूषण लिमये (उपसंपादक, साम टी.व्ही. मराठी) व राहुल भालशंकर (संपादक, तेजस न्यूज महाराष्ट्र), तसेच
तथागत भगवान गौतम बुद्ध विशेष गौरव पुरस्कार – सम्यक विचार मंच – मिलिंद व्याख्यानमाला, सोलापूर.
सर्व पुरस्कारार्थींना सपत्नीक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ, शाल व वृक्षरोप देऊन गौरविण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात मातोश्री रुक्मिणी फाऊंडेशन, सोलापूर यांच्या वतीने जिल्ह्यातील अनाथ, निराधार, गरजू तसेच एम.पी.एस.सी./ यु.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात येणार आहेत.
या प्रसंगी गौरव समितीचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, सचिव प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, रमेश लोखंडे, प्रा. युवराज भोसले, रवी देवकर, उपप्राचार्य प्रकाश शिंदे, निलकंठ शिंगे, मिलिंद भालशंकर, दाऊत आतार, प्रा. डॉ. राजदत्त रासोलगीकर आदी उपस्थित होते.



0 Comments