Advertisement

Breaking News
Loading...

बहुजन चळवळीच्या आधारवडाचा आधार हरपला; प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई गायकवाड यांचे निधन...

 


सोलापूर शहर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस तसेच बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांच्या मातोश्री रुक्मिणी (बाई) गंगाराम गायकवाड यांचे बुधवार, दि. 17 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने वयाच्या 85व्या वर्षी दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने गायकवाड कुटुंबावर शोककळा पसरली असून सामाजिक, शैक्षणिक व बहुजन चळवळीशी संबंधित वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. साधे, कष्टमय व संस्कारक्षम जीवन जगणाऱ्या रुक्मिणीबाईंनी आपल्या कुटुंबाला मूल्याधिष्ठित विचारांची शिकवण दिली.

त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 7.50 वाजता, उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील निवासस्थानापासून निघणार आहे.

त्यांच्या निधनानिमित्त महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना. 🙏


Post a Comment

0 Comments