दक्षिण सोलापूर हॅलो रिपोर्टर न्यूज (प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे) : आज सोलापूर–अक्कलकोट मार्गावर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा भव्य वृक्षारोपण उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमाची संकल्पना व नियोजन माननीय पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
उद्घाटन माननीय पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अक्कलकोट विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. विलास यामावार तसेच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी श्री. मनीभूषण यांच्या हस्ते पार पडले.
वळसंग पोलिस ठाण्याचे एपीआय राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस विभागातील अधिकारी- कर्मचारी, जीआरएमआर पथक तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उपक्रमाला यशस्वी केले.
या अंतर्गत सोलापूर–अक्कलकोट रोडच्या दोन्ही बाजूंना वड, पिंपळ, बोकर, नीम अशा छायादायी व पर्यावरणपूरक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यालगत हिरवाई वाढविणे व स्वच्छ-सुंदर पर्यावरण निर्मिती हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून तो प्रभावीपणे साध्य झाल्याचे वळसंग पोलिस ठाण्याचे एपीआय राहुल डोंगरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, पोलिस अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांचे वळसंग पोलिस ठाणे यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.






0 Comments