कामती (मोहोळ तालुका हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी) : मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या सरपंच चषक हॉलीबॉल स्पर्धेत कामती बुद्रुक हॉलीबॉल संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात कामती बुद्रुक संघाने कामती पोलीस ठाणे संघाचा २१-०५ अशा फरकाने पराभव केला.
या रंगतदार सामन्यात पहिल्यांदा सर्व्हिस करणाऱ्या पोलीस ठाणे संघाला केवळ पाच गुणांवर समाधान मानावे लागले. विजयी कामती बुद्रुक संघाने सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखत सरळ विजय मिळवला. या स्पर्धेत कामती पोलीस ठाणे संघ उपविजेता ठरला, तर वाघोली संघाने तिसरा क्रमांक पटकावला.
कामती गावाचे सरपंच प्रवीण भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी कामती पोलीस ठाण्याच्या वतीने या सरपंच चषक हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेतील विजेत्या व सहभागी संघांच्या कर्णधारांना ट्रॉफीचे वितरण सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार व सरपंच प्रवीण भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कामती बुद्रुक संघाचे कर्णधार योगेश गायकवाड, कामती पोलीस ठाणे संघाचे कर्णधार सपोनी ज्ञानेश्वर उदार, वाघोली संघाचे कर्णधार नितीन उघडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक रामचंद्र म्हमाणे, क्रीडा शिक्षक आण्णा कुलाल, पोहेकॉ अनुप दळवी, अन्सारी, गजानन भंडारे, चरण शेळके, माजी ग्रामपंचायत सदस्य बंडू गायकवाड, परमेश्वर कोडक, अरुण लोहार, संतोष जाधव, विजय गायकवाड, धर्मा अंकुशराव, आबा गायकवाड, अतिन उघडे, चेतन भुरे, कार्तिक अंकुशराव, विष्णू कांबळे, परशुराम मंजुळे, आप्पा माळगोंडे, कुबेर माळगोंडे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

0 Comments