Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूर जिल्हा न्यायालयात ॲड. उघडे दाम्पत्यांच्या नवीन वकील कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन...

 


सोलापूर शहर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी :– मोहोळ तालुक्यातील वाघोली येथील ॲड. नितीन उघडे पाटील व त्यांची पत्नी ॲड. सोनाली उघडे पाटील यांच्या नवीन वकील कार्यालयाचे उद्घाटन सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय आवारात मोठ्या उत्साहात पार पडले.

या नूतन कार्यालयाचे उद्घाटन सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबा जाधव, उपाध्यक्ष रियाज शेख, सचिव बसवराज हिंगमिरे, सहसचिव मिरा प्रसाद, खजिनदार अरविंद देडे, ॲड. सोमनींग पुजारी व ॲड. स्वाती बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

मनोगत व्यक्त करताना ॲड. बाबा जाधव म्हणाले की, “ॲड. उघडे दाम्पत्यांनी वकिली व्यवसायात प्रामाणिकपणे काम केल्याने आज त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. वाघोलीसारख्या ग्रामीण भागातून येऊन त्यांनी जिल्हा न्यायालयात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

ॲड. सोमनींग पुजारी यांनीही ज्युनियर अवस्थेतील संघर्ष आणि मार्गदर्शनाबाबत मनोगत व्यक्त करत ॲड. उघडे दाम्पत्यांचे कौतुक केले. यावेळी ॲड. नितीन उघडे यांनी “आजचे हे यश माझे वडील कै. दामू उघडे, कै. ॲड. शावरसिद्ध पुजारी आणि आई श्रीमती विजुबाई उघडे यांच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले,” असे सांगून कृतज्ञता व्यक्त केली.

नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाने वकील व न्यायालयीन वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.


Post a Comment

0 Comments