दक्षिण सोलापूर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: सोलापूर- विजापूर महामार्गावरील नांदणी ते वडकबाळ दरम्यान असलेल्या वैष्णवी पेट्रोल पंपाजवळ रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात वडकबाळ येथील तरुण ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रविराज सिद्धाराम बगले (वय वर्षें ३४, रा. वडकबाळ, ता. दक्षिण सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
रविराज हा रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास नांदणी येथून दुचाकीवरून वडकबाळकडे जात असताना पेट्रोल पंपाजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला त्याची दुचाकी जोरात धडकली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला.
जखमी अवस्थेत त्याचा भाऊ सचिन बगले यांनी त्याला तत्काळ सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच रविराजचा मृत्यू झाला.
या प्रकरणाची प्राथमिक नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

0 Comments