Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूर बार्शी महामार्गावर नान्नजजवळ भीषण अपघात एसटी बसला दुचाकीची जोरदार धडक; दोन युवक जागीच ठार...

 

 

सोलापूर शहर हॅलो रिपोर्टर प्रतिनिधी: सोलापूर–बार्शी महामार्गावर नान्नजजवळ आज झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. एसटी बसला दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत दोघांचा जागीच जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.



घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी भरधाव वेगात असताना समोरून येणाऱ्या एसटी बसला तीने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला असून दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.


नान्नज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. मृत युवकांची ओळख पटविण्याचे आणि अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. स्थानिकांनी या ठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण आणि वेगमर्यादा पाळण्यावर भर देण्याची मागणी केली आहे.


अधिक माहिती प्रतीक्षेत…

Post a Comment

0 Comments