Advertisement

Breaking News
Loading...

माजी पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांची सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयास भेट; हरित उपक्रमांचे कौतुक...

 


सोलापूर | प्रतिनिधी (हॅलो रिपोर्टर न्यूज): सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने राबवलेल्या हरित व सामाजिक उपक्रमांची माजी पोलीस महासंचालक (महाराष्ट्र) श्री. प्रविण दीक्षित यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. ते सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयास सपत्नीक भेट देण्यासाठी आले असता पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.


पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस दलात शिस्त व सुव्यवस्था राखतानाच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे. यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत ‘हरित वारी’ उपक्रमाअंतर्गत पोलीस विभागाकडून सुमारे १.७ लाख वृक्षांची लागवड व संवर्धन करण्यात आले आहे. हे संपूर्ण कार्य ‘हरित वारी’ मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून काटेकोरपणे नोंदवले जात आहे.



पोलीस मुख्यालय परिसरात चिंच, आंबा, करंज, बोरी, रामफळ आदी ऑक्सिजननिर्मिती करणाऱ्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आल्याने परिसर हिरवागार झाला असून तो प्रेक्षणीय ठिकाण ठरत आहे. दररोज वृक्षलागवडीसाठी प्रयत्नशील असलेल्या पोलीस अधीक्षकांनी मुख्यालयात पोलीस नर्सरी सुरू केली असून, विविध प्रकारची रोपे स्वस्त दरात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

याशिवाय नागरिकांना सात्त्विक, नैसर्गिक भाजीपाला व दैनंदिन वापराच्या वस्तू सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी पोलीस मुख्यालयातील पेट्रोल पंप परिसरात ‘ऑरगॅनिक मॉल’ सुरू करण्यात आला आहे.

भेटीदरम्यान माजी पोलीस महासंचालक श्री. प्रविण दीक्षित यांनी नर्सरी, ऑरगॅनिक मॉल व वृक्षबागेची पाहणी केली. आपल्या अनुभवांच्या आधारे त्यांनी या उपक्रमांचे विशेष कौतुक करत सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने उभारलेला हा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.

यावेळी पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पोवार, श्री. संजय जगताप, श्री. दत्तात्रय वाघमोडे तसेच राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री. ढाकणे उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments