Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूर शहर पोलिसांची दमदार कामगिरी : 2025 मध्ये 1 कोटी 6 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, 36 गंभीर गुन्हे उघड; पथकाचा सन्मान...

 


सोलापूर शहर| हॅलो रिपोर्टर न्यूज :

आज दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी झालेल्या वार्षिक गुन्हे आढावा बैठकीत सोलापूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी केली. सन 2025 मध्ये उत्कृष्ट गुन्हे शोध व मालमत्ता हस्तगत केल्याबद्दल आदरणीय पोलीस आयुक्त एम. राजकुमार (सोलापूर शहर) यांच्या हस्ते संबंधित पथकास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या पथकाने सन 2025 या वर्षात एकूण 1 कोटी 6 लाख रुपये



किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत महत्त्वाचे व गंभीर स्वरूपाचे 36 गुन्हे उघडकीस आणले आहेत. शहरातील कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी केलेल्या या प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या यशाचे श्रेय आदरणीय पोलीस उपायुक्त (गुन्हे) अश्विनी पाटील मॅडम, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजन माने तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलेल्या अविरत मेहनतीस व उत्कृष्ट टीमवर्कला देण्यात आले आहे.

कामगिरी पथक:

एपीआय शैलेश खेडकर, पो ह संदीप जावळे, विनोद रजपूत, पोकॉ इम्रान जमादार, राजकुमार पवार, उमेश पवार.

शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी केलेली ही कामगिरी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोलाची ठरत आहे.

Post a Comment

0 Comments