Advertisement

Breaking News
Loading...

दक्षिण सोलापूर तहसीलमध्ये नामनिर्देशनांचा ओघ; 21 जानेवारीला विक्रमी अर्ज — गटात 73, गणात 145 नामनिर्देशन दाखल...

 


दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लू अण्णा कांबळे:

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय, दक्षिण सोलापूर येथे नामनिर्देशन प्रक्रियेला चांगलाच वेग आला आहे. तहसील कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत तक्त्यानुसार दि. 16 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी मोठ्या प्रमाणात नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत.

जिल्हा परिषद गट (57 ते 62):

या कालावधीत जिल्हा परिषद गटांमधून एकूण 73 नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले असून, यामध्ये 21 जानेवारी 2026 रोजी सर्वाधिक 50 अर्ज दाखल झाले आहेत.

गट 57 – बोरामणी: एकूण 20 अर्ज

गट 58 – कुंभारी: 13 अर्ज

गट 59 – वळसंग: 13 अर्ज

गट 60 – हत्तूर: 6 अर्ज

गट 61 – मंदूप: 11 अर्ज

गट 62 – भंडार कवठे: 10 अर्ज

(दि. 19 जानेवारीला 3 अर्ज, दि. 20 जानेवारीला 20 अर्ज)


पंचायत समिती गण (113 ते 124):

पंचायत समितीच्या विविध गणांमधून एकूण 145 नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले असून, यामध्येही 21 जानेवारी 2026 रोजी 99 अर्ज दाखल होऊन विक्रमी नोंद झाली आहे.

गण 113 – कासेगाव: 14

गण 114 – बोरामणी: 10

गण 115 – कुंभारी: 15

गण 116 – धोत्री: 6

गण 117 – वळसंग: 13

गण 118 – होटगी: 18

गण 119 – हत्तूर: 18

गण 120 – औराद: 13

गण 121 – मंदूप: 12

गण 122 – कंदलगाव: 12

गण 123 – भंडारकवठे: 5

गण 124 – निंबर्गी: 9

(दि. 19 जानेवारीला 4 अर्ज, दि. 20 जानेवारीला 42 अर्ज)

राजकीय वातावरण तापले:

नामनिर्देशनांच्या वाढत्या संख्येमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील निवडणूक वातावरण चांगलेच तापले असून, प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या संख्येने रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील टप्प्यात अर्जांची छाननी, माघार व अंतिम उमेदवार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




“स्रोत : तहसील कार्यालय, दक्षिण सोलापूर / निवडणूक निर्णय अधिकारी”


Post a Comment

0 Comments