Advertisement

Breaking News
Loading...

मिरजमध्ये मोक्काचा महाप्रहार...! निखिल कलगुटगी खून प्रकरणात १५ जण मोक्काच्या कचाट्यात; सांगली-मिरजमधील गुन्हेगारी टोळीचा कणा मोडला..

 


सांगली | दि. १३ जानेवारी २०२६ | हॅलो रिपोर्टर न्यूज:

मिरज शहरातील निखिल विलास कलगुटगी खून प्रकरणात संघटित गुन्हेगारीविरोधात मोठी कारवाई करत मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाईस मंजुरी दिली आहे. या कारवाईत १५ आरोपी मोक्काच्या कचाट्यात सापडले असून मिरजमधील कुख्यात गुन्हेगारी टोळीचे कंबरडे मोडले आहे.


मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. ३८७/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता, आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील गंभीर कलमान्वये दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना, आरोपींकडून २०१७ ते २०२५ या कालावधीत सातत्याने गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.


टोळीचा धुमाकूळ : खून, खंडणी, दहशत आणि बेकायदेशीर शस्त्रसाठा...

टोळी प्रमुख प्रथमेश सुरेश ढेरे व त्याचे साथीदार कोणताही कायदेशीर व्यवसाय न करता, मिरज शहर परिसरात दहशत माजवून खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडे, गंभीर मारहाण, विनयभंग, बेकायदेशीर अग्निशस्त्र वापर यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपासात उघड झाले. आर्थिक फायद्यासाठी आणि वर्चस्व टिकवण्यासाठी या टोळीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते.


निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई...

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मोक्कास मंजुरी देत संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्याचा ठोस संदेश पोलीस प्रशासनाने दिला आहे.


वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई:

ही संपूर्ण कारवाई मा. श्री. सुनिल फुलारी (विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर), संदीप घुगे (पोलीस अधीक्षक, सांगली) व श्रीमती कल्पना बारवकर (अपर पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास अधिकारी प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज यांनी प्रस्ताव सादर केला होता.


सदर गुन्ह्याचा पुढील तपास विपुल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, विटा उपविभाग यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.


पोलिसांचा इशारा: 👇

संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर यापुढेही कडक नजर ठेवून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Post a Comment

0 Comments