जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेला वेग; बोरामणीसह ७ ठिकाणी नामनिर्देशन दाखल...
दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन प्रक्रियेला गती आली असून दि. 19 जानेवारी 2026 रोजी विविध गट व गणांमध्ये एकूण ७ उमेदवारांनी आपली नामनिर्देशने दाखल केली आहेत.
आज प्राप्त झालेल्या नामनिर्देशनांमध्ये जिल्हा परिषद गट क्रमांक 57 बोरामणी येथून शिवसेनेचे धनेश अचलारे, गट क्रमांक 60 हत्तूर येथून भाजपच्या उज्ज्वला अनिल हवीनाळे, तर गट क्रमांक 62 भंडार कवठे येथून काँग्रेसच्या रुपादेवी अमसिद्ध कमळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
तसेच पंचायत समिती गण स्तरावर गण क्रमांक 114 बोरामणी येथून भाजपच्या सारिका नागनाथ पाटील, गण क्रमांक 115 कुंभारी येथून भाजपचे अशोक बाबुराव करजोळे, गण क्रमांक 120 औराद येथून भाजपचे संदीप अमृत टेळे आणि गण क्रमांक 124 निंबर्गी येथून भाजपच्या सुषमा नागनाथ दुपारगुडे यांनी नामनिर्देशन दाखल केले आहे.
दरम्यान, निवडणूक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार...
दि. 16 जानेवारी 2026 रोजी अर्ज विक्री संख्या – 195,
दि. 17 जानेवारी 2026 रोजी अर्ज विक्री संख्या – 110,
दि. 19 जानेवारी 2026 रोजी अर्ज विक्री संख्या – 163
अशी असून आजअखेर एकूण 468 अर्जांची विक्री झालेली आहे.
आजअखेर प्राप्त नामनिर्देशनांचा आढावा घेतला असता “जिल्हा परिषद गटांत ३ तर पंचायत समिती गणांत ४ नामनिर्देशने दाखल झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे.”

0 Comments