Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट गंभीर जखमी; रेस्क्यू टीमच्या तत्परतेमुळे जीवदान...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज| प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:

 सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक काळवीट गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मंद्रूप एसटी स्टँडसमोर हा अपघात घडला. वाहनाच्या जोरदार धडकेमुळे काळवीट गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले होते.



घटनेची माहिती मिळताच मंद्रूप येथील सामाजिक कार्यकर्ते उस्मान नदाफ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी काळवीटाला प्राथमिक दिलासा दिला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार बबलू शेख यांच्या माध्यमातून जखमी काळवीटाला मंद्रूप पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.



मंद्रूप पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज पवार यांनी घटनेची तात्काळ दखल घेत रेस्क्यू टीमला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच रेस्क्यू टीमची गाडी मंद्रूप पोलीस स्टेशन येथे दाखल झाली व जखमी काळवीटाला पुढील उपचारासाठी ताब्यात घेऊन उपचारासाठी रवाना करण्यात आले.



सामाजिक कार्यकर्ते उस्मान नदाफ, पत्रकार बबलू शेख तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळेवर दाखवलेल्या तत्परतेमुळे या काळवीटाला वेळेत उपचार मिळाले असून त्याचे प्राण वाचले आहेत. या घटनेमुळे नागरिकांकडून सर्व संबंधितांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments