Advertisement

Breaking News
Loading...

रविवारचा चहा 🍵 क्र.- १९० अतंर्मनाचा आवाज'

 


रविवारचा चहा 🍵 क्र.- १९० 


 'अतंर्मनाचा आवाज'


एका राजा ने अतिशय सुंदर ''महाल'' बनवला आणि महालाच्या मुख्य द्वारावर एक ''गणिताचे सूत्र'' लिहीले आणि घोषणा केली की या सूत्रानुसार हा महाद्वार जो कोणी उघडेल त्याला मी माझा उत्तराधिकारी घोषित करेन ! कारण राजा निपुत्रीक होता व त्याला राज्य अशा व्यक्तीकडे द्यायचे होते कि ती व्यक्ती अतिशय चाणाक्ष असावी ! घोषणा ऐकून राज्यातले मोठे मोठे गणित तज्ञ आले आणि सूत्र पाहुन निघून गेले कारण असं सुत्र त्यांनी आयुष्यात पाहिलं नव्हतं? 


मुदतीचा शेवटचा दिवस आला त्या दिवशी तीन लोक आले आणि म्हणाले आम्ही हे सूत्र सोडवायचा प्रयत्न करतो त्यामधील दोन जण दुसऱ्या राज्यातील मोठे गणित तज्ञ होते आणि एक त्याच राज्यातील अतिशय गरीब पण हुशार असा शेतकरी होता ! गणित तज्ञांनी वेगवेगळी सुत्रे वापरून पाहिली पण दरवाजा उघडु शकले नाही ? सर्व लोक हैराण झाले कि जिथं एवढे मोठे गणीत तज्ञ हरले तिथे हा शेतकरी काय करील बिचारा साधासुधा माणुस? शेवटी त्याला सांगण्यात आलं की चला तुमची वेळ आली आहे ! 


शेतकऱ्याने सहज स्मित हास्य केलं दरवाजाकडे गेला सूत्र वाचलं पण त्याला काय कळणार ? शेवटी त्याने चाणाक्षपणे दरवाजा न्याहळुन त्याला मागे ढकलले ! आणि काय आश्चर्य दरवाजा सहज उघडला ? सर्व हैराण झाले आणि त्याच्या नावाचा जयजयकार केला ! 


 त्याचा सन्मान करुन राजाने सहज विचारलं की आपण काय सूत्र वापरून दरवाजा उघडला ? तो शेतकरी नम्रपणे म्हणाला की "मी विचार केला कि गेले सहा दिवस एवढे मोठे विद्वान सुत्रे वापरतात पण दरवाजा उघडत नाही मग सुत्रच खोटे असावे आणि दरवाजा पाहिला तर त्याला कडीकुलुप पण दिसत नाही ? मी ठरवलचं होत की समस्या काय आहे हे पहिले बघू नंतर ती कशी सोडवायची ते ठरवू आणि मी तेच केलं ".


कित्येकवेळा जीवनात ''समस्या'' ही नसतेच पण आम्ही त्या विचारांनीच अर्धमेले होतो की ती कशी सुटेल आणि चिंता करताना ती समस्या विनाकारण अतिशय जटील बनते, जीवन दुःखी होण्याचं हेच मोठ कारण आहे की आम्ही नको तिकडे जास्त लक्ष देतो !


 प्रा. दिलीप आनंदराव जाधव

               सचिव

सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली.               


          राज्य कोषाध्यक्ष

निष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.

Post a Comment

0 Comments